साउदम्प्टन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. सत्र सुरु होताना न्यूझीलंडची अवस्था २ बाद १०१ होती आणि जेव्हा सत्र संपले तेव्हा ५ बाद १३४ अशी झाली. दरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या स्लेजिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाचा- WTC फायनलमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडिओ स्लेजिंग करतानाचा आहे. विराटचा हा व्हिडिओ सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा आहे. यात न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम फलंदाजी करत होता. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी सुरू असताना विराट म्हणतो, त्याला काही समजत नाही जेस (जसप्रीत बुमराह), तु त्याच्यावर आक्रमक हो, तो चेंडूला स्पर्ध देखील करू शकणार नाही. तु त्याला पुढे गोलंदाजी करून बाद करू शकतोस. विराटचे हे बोलने स्टंप माइकमध्ये सर्वांना ऐकू गेले. वाचा- वाचा- फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडची फलंदाजी करत असताना भांगडा करताना दिसला होता. त्याचा तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. विराटचा हा डान्स पाहून मैदानावर उपस्थित असलेल्या भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wOxGVD
No comments:
Post a Comment