साऊदम्पटन : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फायनलमध्ये चांगलाच यशस्वी ठरत असल्याचे पाहायला मिळाले आहे. शमी या सामन्यात का यशस्वी ठरत आहे, याचे रहस्य आता उलगडले आहे. फायनलमध्ये शमीने सर्वाधिक चार विकेट्स मिळवत भारताला घवघवीत यश मिळवून दिले आहे. भारताच्या जसप्रीत बुमराला यावेळी एकही विकेट मिळवता आलेला नाही. त्यामुळे शमी हा का यशस्वी ठरत आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. शमी हा चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग करू शकतो, म्हणजे तो फलंदाजाच्या दोन्ही बाजून चेंडू चांगले बाहेर काढू शकतो. इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाज चांगलेच यशस्वी ठरत असतात आणि याचा फायदा आता शमीला झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शमी हा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. इशांत शर्मा हा जास्तकरून उजव्या स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला आहे. त्यामुळे इशांत शर्माच्या गोलंदाजीवर फलंदाज अडखळताना कमी पाहायला मिळतात. त्याचबरोबर बुमराची गोलंदाजी शैली चांगली असली तरी तो चेंडूला स्विंग करण्यासाठी आपल्या गोलंदाजीचा वेग कमी करताना दिसत नाही. त्यामुळे शमी हा सध्याच्या घडीला यशस्वी गोलंदाज ठरल्याचे पाहायला मिळत आहे. शमीने यावेळी न्यूझीलंडच्या रॉस टेलर, वॉल्टिंग, कॉलिन डी ग्रँडहोम आणि कायले जेमिन्सन या चार फलंदाजांना बाद केले आहे. शमीने यावेळी शिस्तबद्ध मारा केला आणि या गोष्टीमुळेच त्याला जास्त यश मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शमी आता न्यूझीलंडच्या किती फलंदाजांना बाद करतो, याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना नक्कीच असेल. न्यूझीलंडच्या डावातील ६३व्या षटकात मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर अनुभवी रॉस टेलरला बाद केले. शुभमन गिलने कव्हर्समध्ये शानदार असा कॅच घेतला. गिलने उजव्या बाजूला हवेत उडी मारून कॅच घेतला. विकेट घेण्याआधी ड्रिंक ब्रेकमध्ये कर्णधार विराट कोहली शमीला काही गोष्टी समजवून सांगत होता. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर शमीने रॉस टेलरला बाद केले. त्याने ३७ चेंडूत ११ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vU9dwY
No comments:
Post a Comment