नवी दिल्ली : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलसाठी आपला १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नेमके कोणते ११ खेळाडू उतरू शकतील, हे आता समोर आले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये कोणते ११ खेळाडू उतरतील ते आता भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी स्पष्ट केले आहे. गावस्कर म्हणाले की, " माझ्यामते फायनलमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, रिषभ पंत यांना संधी मिळेल. त्याचबरोबर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन अष्टपैलू खेळाडूंनाही संधी दिली जाईल. पण वेगवान गोलंदाजांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळेले. माझ्यामते मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांना या फायनलमध्ये स्थान मिळेल. त्याचबरोबर इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्याचील एकाला निवडणे थोडेसे कठीण असेल, पण माझ्यामते इशांत शर्माला या सामन्यात संधी द्यायला हवी. कारण इशांतकडे चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर इशांतची उंची चांगली असल्यामुळे तो इंग्लंडच्या खेळपट्टीवर अधिक प्रभावी ठरू शकेल. त्यामुळे माझ्यामते तरी इशांत शर्माला या सामन्यात संधी द्यायला हवी." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " भारतीय संघाचे सलामीवीर जर जास्त काळ सुरुवातीला तग धरून राहिले तर ते चांगले होईल. जर सलामीवीर जास्त काळ फलंदाजी करू शकले तर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते. भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम आहे. या दोन्ही गोष्टी भारतीय संघाची बलस्थाने आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या या फायनलमध्ये भारतीय संघ नेमकी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल." अश्विन आणि जडेजा यांच्याकडे चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर जडेजा आणि अश्विन हे चांगली फलंदाजीही करू शकतात. त्यामुळे त्यांना संघात स्थान देणे कधीही हितीचे ठरू शकते. त्यामुळे या सामन्यात हनुमा विहारीचा विचार केला जाणार नाही, असे सध्याच्या घडीला दिसते आहे. त्याचबरोबर सिराजलाही या संघात स्थान मिळू शकणार नाही, असे सध्याच्या घडीला तरी दिसत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wBgd2S
No comments:
Post a Comment