नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनल आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. पण या फानलपूर्वी एक महत्वाची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार आता या फायनलमध्ये कोणत्या संघाचे पारडे जड असणार आहे, हे पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. या ५९ कसोटी सामन्यांमध्ये भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडला १२ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. या ५९ सामन्यांपैकी २६ सामने हे अनिर्णीत राहीलेले आहेत. त्यामुळे कसोटीतील आकडेवारीचा विचार करता भारताचे पारडे हे न्यूझीलंडपेक्षा जड आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसीच्या स्पर्धेतील आकडेवारीही आता समोर आली आहे. आयसीसीच्या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश ११ वेळा आमने-सामने आले आहेत. पण यामध्ये भारताला आतापर्यंत फक्त तीनच सामने जिंकता आले आहेत, तर न्यूझीलंडने तब्बल आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये वनडे विश्वचषकात आठ सामने झाले आहेत, यामध्ये न्यूझीलंडने पाच सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाला तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धेत भारतापुढे न्यूझीलंडचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी दोन्ही संघाचे पारडे हे समान असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये नेमकं काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ हा इंग्लंडबरोबर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला आहे. या मालिकेत न्यूझीलंडने विजय साकारला आहे. त्यामुळे फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ चांगल्या फॉर्मात दिसत आहे. पण दुसरीकडे भारतीय संघानेही कसून सराव केला आहे. त्यामुळे भारतीय संघातील काही खेळाडू चांगले फॉर्मात आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wMDTl3
No comments:
Post a Comment