साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या शुक्रवारपासून कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी लढत होणार आहे. गेल्या महिन्याभरापासून या ऐतिहासिक लढतीसंदर्भात चर्चा सुरू आहे. दोन्ही संघांनी यासाठी जोरदार तयारी केली असून आता चाहत्यांना मैदानावरील कामगिरीची प्रतिक्षा आहे. वाचा- भारताविरुद्धच्या लढतीला फक्त २४ तासांचा कालावधी शिल्लक असताना न्यूझीलंडच्या आघाडीचा जलद गोलंदाज याने भारताचा सलामीवीर रोहित शर्माची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. फायनल सामन्याच्या आधी न्यूझीलंडच्या अनुभवी गोलंदाज याने ही भीती बोलून दाखवली. वाचा- साउदीच्या मते आणि विराट कोहली यांच्या सारख्या सर्वोत्तम फलंदाजांमुळे भारतीय संघाची फलंदाजी खुप मजबूत आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागले. रोहित शर्मा हा सामना आमच्या हातातून काढून घेऊ शकतो. तो तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शानदार फलंदाजी करतो. तो विरोधी संघाकडून सामना स्वत:कडे खेचून आणू शकतो. गोलंदाजांच्या नजरेतून पाहायचे झाले तर तो सर्वात धोकादायक फलंदाज आहे. वाचा- साउदीने न्यूझीलंडकडून ७८ कसोटीत ३०९ विकेट घेतल्या आहेत. आम्ही फक्त भारताच्या अनुभवी खेळाडूंचा नाही तर ऋषभ पंत आणि शुभमन गिल या फलंदाजांचे व्हिडिओ पाहत आहोत, असे त्याने सांगितले. न्यूझीलंडने गेल्या दोन वर्ल्डमध्ये उपविजेतेपद मिळवले होते. त्यांनी २००० साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद देखील मिळवले होते. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xkMlHY
No comments:
Post a Comment