लंडन: भारीतय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) साऊदम्प्टन येथे १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने सराव सुरू केला असून दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. वाचा- WTC फायनल खेळण्याआधी या दोन्ही संघाची तुलना केली जात आहे. मजबूत आणि कमकूवत बाजू कोणती याबाबत दिग्गज खेळाडू त्यांची मते देत आहे. अशात भारतीय संघासाठी काळजी करणारी एक आकडेवारी समोर आली आहे. भारतीय संघ जेव्हा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीच्या स्पर्धतील खराब कामगिरी त्यांच्या डोक्यात नक्कीच असेल. वाचा- आयसीसीच्या स्पर्धेत भारताने न्यूझीलंडविरुद्ध २००३ साली अखेरचा विजय मिळवाल होता. २००३च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताने त्यांचा पराभव केला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडवर सात विकेटनी मात केली होती. त्या सामन्यात जलद गोलंदाज जहीर खानने चार तर हरभजन सिंगने दोन विकेट घेतल्या होत्या. या विजयानतंर भारताने आयसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडचा एकदाही पराभव केला नाही. २००७ साली न्यूझीलंडने साखळी फेरीत भारताचा १० धावांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१६ साली टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून ४७ धावांनी पराभव झाला. वाचा- न्यूझीलंड संघाने २०१९च्या वर्ल्डकप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये १८ धावांनी भारताचा पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असताना दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा हिस्सा होती. तेव्हा पहिल्या कसोटीत भारताचा १० विकेटनी तर दुसऱ्या कसोटीत सात विकेटनी पराभव झाला होता. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pypK7W
No comments:
Post a Comment