लंडन: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिली लढत लॉर्ड्स मैदानावर झाली होती. ही लडत ड्रॉ झाली होती. आता मालिकेतील दुसरी आणि अंतिम लढत एजबेस्टन येथे होणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंड संघाला एक मोठा झटका बसला आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर न्यूझीलंडला भारताविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. पण त्याआधीच न्यूझीलंडचा कर्णधार याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत तो न खेळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील निर्णय आज बुधवारी घेतला जाणार आहे. दुसरी कसोटी उद्या १० जूनपासून सुरू होणार आहे. वाचा- न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी मंगळवारी ही माहिती दिली. दुसऱ्या कसोटीनंतर WTC फायनल खेळायची असल्याने केन विलियमसनबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. वाचा- दुसऱ्या कसोटीच्या आधी विलियमसनसोबत न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला आहे. स्टार फिरकीपटू मिशेल सॅटनरला देखील दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. मिशेलच्या इंडेक्स फिंगरला दुखापत झाली आहे. न्यूझीलंडच्या अधिकृत ट्विटवरून याची माहिती देण्यात आली आहे. वाचा- विलियमसनच्या कोपराला दुखापत झाली असून तो दुसरी कसोटी खेळणार की नाही याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केनला पहिल्या डावात १३ तर दुसऱ्या डावात फक्त एक धाव करता आली होती. दुसऱ्या कसोटी आधी न्यूझीलंडला एक दिलासा मिळाला आहे. तो म्हणजे बोल्टचा संघात समावेश झाला आहे. पहिल्या कसोटीत तो खेळू शकला नव्हता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3it4MG4
No comments:
Post a Comment