नवी दिल्ली : फायनलला आता काहीच दिवस उरलेले असताना भारतीय संघाला एक मोठी चिंता सतावत आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धचा नकोसा रेकॉर्ड आता समोर आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आयसीसीच्या स्पर्धेत जे सामने झाले त्यांची आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीनुसार भारतविरुद्ध न्यूझीलंडचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आयसीसीच्या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश ११ वेळा आमने-सामने आले आहेत. पण यामध्ये भारताला आतापर्यंत फक्त तीनच सामने जिंकता आले आहेत, तर न्यूझीलंडने तब्बल आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये वनडे विश्वचषकात आठ सामने झाले आहेत, यामध्ये न्यूझीलंडने पाच सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाला तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धेत भारतापुढे न्यूझीलंडचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडने या फायनलसाठी भारतापेक्षा चांगली तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण न्यूझीलंडचा संघ फायनलपूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळला आहे आणि या कसोटी सामन्याच्या मालिकेत त्यांनी १-० असा विजय मिळवला आहे. त्यामुळे या फायनलसाठी न्यूझीलंडचे पारडे जड असल्याचे समजले जात आहे. दुसरीकडे भारतीय ंसंघाने सराव सामना खेळला आहे आणि त्यामध्ये खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघापुढे असेल ही अजून एक चिंता...भारतीय संघात नेमके कोणते पाच गोलंदाज खेळवायचे ही चिंता नक्कीच कर्णधार विराट कोहलीला असेल. भारताने जर तीन वेगवान गोलंदाज खेळवले तर त्यांना आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही संधी देता येणार आहे. या दोघांकडेही चांगला अनुभव आहे. त्याचबरोबर हे दोघेही उपयुक्त फलंदाजी करू शकतात. त्यामुळे या दोघांना संधी देण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. पण त्यासाठी कोणत्या तीन गोलंदाजांना आता निवडले जाते, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना नक्कीच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pUkR9w
No comments:
Post a Comment