नवी दिल्ली : भारतीय संघाची घोषणा झाल्यावर काही चाहते चांगलेच नाराज झालेले आहेत. कारण त्यांना या संघात एक महत्वाचा खेळाडू हवा होता. त्यामुळे यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला संधी न देता या खेळाडूला स्थान दिले असते, तर ते चांगले झाले असते असे काही चाहत्यांना वाटत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या संघात रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा या दोन यष्टीरक्षकांना स्थान देण्यात आले आहे. यापैकी सामान खेळण्याची संधी रिषभ पंतला मिळणार, हे जवळपास निश्चित समजले जात आहे. काही कारणास्तव जर पंत खेळू शकला नाही तर त्याच्यासाठी राखीव यष्टीरक्षक म्हणून साहाची संघी निवड करण्यात आली आहे. पण साहाऐवजी भारतीय संघात लोकेश राहुलला संधी द्यायला हवी होती, असे काही चाहत्यांचे म्हणणे आहे. राहुल हा चांगला फलंदाज असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण तो यष्टीरक्षणही करतो. भारताच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये राहुलने बऱ्याचदा यष्टीरक्षण केले आहे. त्यामुळे दमदार फलंदाज आणि उपयुक्त यष्टीरक्षक असलेला लोकेश राहुल भारतीय संघात हवा होता, असे काही चाहत्यांना वाटत आहे. पण हा दौरा जवळपास तीन महिन्यांचा आहे. त्यामुळे राहुलला या सामन्यात संधी दिली नसावी, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका राहुलला संधी मिळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. फायनलसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा असे दोन यष्टीरक्षक असतील. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे करणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर चेतेश्वरर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे मातब्बर फलंदाज असतील. त्याचबरोबर हनुमा विहारीसारख्या अष्टपैलू खेळाडूला या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. या संघात पाच वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. या पंधरा सदस्यांच्या संघात लोकेश राहुल हवा होता, असे काही चाहत्यांना वाटत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iJsFtm
No comments:
Post a Comment