नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ()ला () स्पर्धेतील एका सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. आता फाफने त्याच्या प्रकृती संदर्भातील अपडेट सोशल मीडियावर दिले आहेत. वाचा- क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळताना पेशावर जाल्मीविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना फाफला दुखापत झाली होती. त्यानंतर मैदानातून थेट त्याला रुग्णालयात स्कॅन करण्यासाठी नेण्यात आले. फाफला रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून तो हॉटेल रुममध्ये परतला आहे. चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. वाचा- तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल सर्वांना धन्यवाद. मी ठिक असून आता हॉटलमध्ये परत आलोय. दुखापतीमुळे मला मेमरी लॉस ( ) झाला आहे. पण लवकरच बरा होऊन मैदानावर परत येईन,असे फाफने सोशल मीडियावर म्हटले आहे. वाचा- मोठाअडथळा वाचा- पेशावर जाल्मीविरुद्धच्या सामन्यात सातव्या षटकात फाफला दुखापत झाली होती. एक चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना फाफ आणि मोहम्मद हुसनैन यांची धडक झाली होती. हुसनैनचा पाय फाफच्या डोक्याला लागला होता. फाफला झालेली दुखापत गंभीर होती. त्याला उठता देखील येत नव्हते. फाफला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. फाफची दुखापत पाहून पत्नी इमाराला धक्काच बसला होता. पाहा काय झाले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pZ1nk5
No comments:
Post a Comment