नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये चर्चा आहे ती भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील फायनलची. पण या फायनलबाबत आता अजून एक गोष्ट समोर आली आहे. ही फायनल जो संघ जिंकेल त्यांच्यावर पैशांचा वर्षाव होणार आहे. विजेतेपदाची ही रक्कम कोट्यावधी रुपयांमध्ये असणार आहे. पाहा नेमके किती कोटी रुपये मिळतील...आयसीसीची ही सर्वात महत्वाची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी आयसीसीने जबरदस्त पैशांचा वर्षाव करण्याचे ठरवले आहे. ही फायनल जो संघ जिंकेल त्याला जवळपास १२ कोटी रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर जो संघ या फायनलमध्ये पराभूत होईल त्यांना ६ कोटी रुपये मिळतील. जर हा सामना अनिर्णीत राहीला किंवा निकाल लागू शकला नाही तर दोन्ही संघांना समान ९ कोटी रुपये मिळतील. त्यामुळे आतापर्यंत एक सामना जिंकल्यावर १२ कोटी रुपये मिळणे, ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे आता भारतीय संघ फायनल जिंकून १२ कोटी रुपये कमावणार का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. भारतीय संघाची जोरदार तयारी...रिषभ पंतने सराव सामन्यात शतक झळकावत धडाकेबाज फलंदाजीचा नमुमा पेश केला. त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने सराव सामन्यात ७६ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. जडेजाच्या या कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. रोहित शर्माने ८०हून अधिक, केएल राहुलने शतक, पंतने ९४ चेंडूत नाबाद १२१, शुभमन गिलने ८५ धावा करत फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिलेत. न्यूझीलंडनेही मिळवला दमदार विजय..न्यूझीलंडचा संघ यजमान असेलल्या इंग्लंडशी अशी दयनीय अवस्था करू शकतो, तर भारतीय संघाचा कसा निभाव लागणार, याच चिंतेमध्ये भारताचे चाहते असतील. कारण न्यूझीलंड आता दुसरा कसोटी सामना इंग्लंडमध्ये खेळत आहेत आणि ते चांगल्या लयीत आले आहेत. दुसरीकडे भारतीय संघ गेल्या कित्येक दिवसांपासून कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्यांना लयीत येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे भारतासाठी फायनलमध्ये न्यूझीलंडशी दोन हात करणे नक्कीच सोपे नसेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xkKpzb
No comments:
Post a Comment