साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. अशात एक झोप उडवणारी बातमी समोर आली आहे. WTC फायनलसाठी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. १८ जूनपासून सुरू होणाऱ्या या लढतीसाठी दोन्ही संघातील खेळाडू साउदम्प्टन येथे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. वाचा- करोना काळात ही लढत होत असल्याने खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवले जात आहे. अशातच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी बायो बबलमधील नियमांचे उल्लंघन केल्याचे वृत्त क्रिक बझने दिले आहे. संघातील काही खेळाडू बायो बबलमधून बाहेर पडले आणि त्यांनी सकाळी गोल्फ खेळल्याचे समजते. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन काळजीत पडले आहे. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI) यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार करणार आहे. वाचा- न्यूझीलंड संघातील खेळाडू ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, हेन्नरी निकोल्स, मिशेल सेंटनर, डेरिल मिशेल आणि संघाचे फिजिओ टॉमी सिमसेक सकाळी गोल्फ खेळण्यास गेले. न्यूझीलंडचे खेळाडू बायो बबलच्या बाहेर पडल्याने भारतीय संघ व्यवस्थापन काळजीत पडले आहे. यासंदर्भात न्यूझीलंड संघाच्या व्यवस्थापनाला वाटते की त्यांच्या खेळाडूंनी तोडलेला नाही. करण हॉटेल आणि गोल्फ कोर्स एकाच परिसरात आहे. जे खेळाडू गोल्फ खेळण्यास गेले होते त्यापैकी सेंटनर आणि डेरियल यांचा समावेश फायनल सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या १५ खेळाडूंमध्ये केला गेला नाही. वाचा- बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीसीने दोन्ही संघांना समान पाहण्याची गरज आहे. ही गोष्टी आयसीसीच्या समोर ठेवली जाणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iSsjQS
No comments:
Post a Comment