नवी दिल्ली : सामना सुरु असतानाच दोन खेळाडू एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...सामना सुरु असतानाच १९ व्या षटकात गोलंदाजाने एक बाऊन्सर टाकला. हा चेंडू फलंदाजी करत असलेल्या खेळाडूच्या चक्क हॅल्मेटॉवर आदळला. त्यानंतर मैदानात चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हा चेंडू झाल्यावर फलंदाज गोलंदाजाच्या अंगावर धावून गेला आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. गोलंदाजीही यावेळी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. कारण तोदेखील फलंदाजाला उत्तर देत होता. आता हे प्रकरण चांगलंच तापणार, असे दिसत होते. त्यावेळी पंचांनी यामध्ये हस्तक्षेप केला. त्याचबरोबर मैदानातील काही खेळाडू ही बाचाबाची सोडवण्यासाठी पुढे सरसावले आणि अनर्थ टळला. सध्याच्या घडीला पाकिस्तान प्रीमिअर लीग सुरु आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराझ अहमद आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रीदी यांच्यामध्ये ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. आबुधाबी येथे लाहोर कलंदर्स और क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यामध्ये हा सामना होत होता. सर्फराझच्या डोक्यावर जेव्हा चेंडू आदळला तेव्हा त्याने एक धाव घेतली आणि तो गोलंदाजाच्या दिशेने गेला. यावेळी गोलंदाजावर त्याने तिखट शब्दांत टिप्पणी केली. त्यानंतर गोलंदाज शाहिन आफ्रीदीही चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. आफ्रदीनेही सर्फराझला काही गोष्टी सुनावल्या. या दोघांमध्ये आता काही तरी घडणार, असे वाटत असताना पंचांबरोबर खेळाडूंनी मध्यस्थी केली आणि हे प्रकरण शांत केल्याचे पाहायला मिळाले. मैदानात घडलले हे काही दिवसातले दुसरे प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन हा पंचांच्या अंगावर धावून गेल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यानंतर शकिबने सर्वांची माफी मागितली होती आणि आपल्याकडून पुन्हा अशी चुक कधी घडणार नाही, अशी ग्वाहीही दिली होती. या गोष्टीचा व्हिडीओदेखील त्यावेळी चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wvihJN
No comments:
Post a Comment