साउदम्प्टन: पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. दोन्ही संघातील खेळाडू आणि संपूर्ण क्रिकेट विश्व या लढतीची वाट पाहत आहे. अशातच या लढतीच्या पहिल्या दिवशी काय चित्र असेल याचे अपडेट दोघा भारतीय खेळाडूंनी दिले आहेत. वाचा- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत आज (१८ जून )पासून सुरु होणार आहे. ही लढत सुरू होण्याच्या आधीच एक काळजी व्यक्त केली जात आहे ती म्हणजे पावसाची होय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस साउदम्प्टन येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. अशात अंतिम ११ मध्ये निवड झालेल्या भारताच्या दोन खेळाडूंनी साउदम्प्टन येथील सध्याच्या परिस्थितीचे फोटो शेअर केले आहेत. वाचा- फिरकीपटू आर अश्विनने त्याच्या इस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात द रोझ बाउल स्टेडियममध्ये पाऊस पडताना दिसत आहे.
ऑलराउंडर रविंद्र जडेजाने देखील इस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ स्टोरी शेअर केली आहे. ज्यात पावसामुळे संपूर्ण खेळपट्टी आणि त्याच्या बाजूच्या भाग झाकण्यात आल्याचे दिसते. वाचा-
पुढील पाच दिवसात साउदम्प्टन येथे किती पाऊस पडेल १८ जून- ९० टक्के पावसाची शक्यता १९ जून- ४० टक्के पावसाची शक्यता २० जून- ८० टक्के पावसाची शक्यता २१ जून- ७० टक्के पावसाची शक्यता
ऑलराउंडर रविंद्र जडेजाने देखील इस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ स्टोरी शेअर केली आहे. ज्यात पावसामुळे संपूर्ण खेळपट्टी आणि त्याच्या बाजूच्या भाग झाकण्यात आल्याचे दिसते. वाचा- from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vCyhbA
No comments:
Post a Comment