साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. इंग्लंडमधील साउदम्प्टन येथील द रोझ बाउल मैदानावर ही लढत होणार असून संपूर्ण क्रिकेट विश्व या लढतीची वाट पाहत आहे. वाचा- ही लढत सुरू होण्याच्या काही तास आधी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या लढतीची वेळ बदलण्यात आली आहे. नियोजित वेळेनुसार या लढतीसाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार होती. तर प्रत्यक्षात सामना ३.३० ला सुरु होणार होता. आता नव्या वेळेनुसार नाणेफेक २.३० वाजता आणि प्रत्यक्षात सामन्याला ३ वाजता सुरुवात होणार आहे. वाचा- ही लडत स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदीवर त्याच बरोबर दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनलवर देखील पाहता येते. या शिवाय maharashtratimes.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट आणि लाइव्ह स्कोअर कार्ड पाहता येतील. WTC फायनलचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney+ Hotstar वर पाहता येईल. वाचा- अंतिम सामन्यासाठी असे आहेत संघ भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, इशांत शर्मा. वाचा- .. न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, काइल जेमिसन, अजाझ पटेल, टॉम ब्लंडेल, नील वॅग्नर, मॅट हेन्री, विल यंग.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gxwr7w
No comments:
Post a Comment