नवी दिल्ली : पावसामुळे फायनचे पहिला सत्र वाया गेले. या सत्रामध्ये ३० षटकांचा खेळ वाया गेला आहे. आता या षटकांची भरपाई कशी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. याबाबत काही नियम ठरवण्यात आले आहेत. या नियमांमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, हे जाणून घ्यायला चाहते उत्सुक आहेत. वाया गेलेली षटकांची भरपाई कशी होणार, जाणून घ्या नियम...आतापर्यंत पावसामुळे ३० षटके वाया गेली आहेत आणि अजूनही पाऊस सुरु आहे. पाऊस थांबल्यावर पंच मैदानाची पाहणी करतील. जी षटके वाया गेली आहेत त्यांची भरपाई अन्य चार दिवसांच्या खेळात होऊ शकते. पण यासाठी पंच आणि सामनाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल. पण जर असे होऊ शकले नाही तर या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. या दिवशी जी षटके वाया गेली आहेत, ती खेळवण्यात येऊ शकतील. सध्याच्या घडीला या सामन्यात पावसामुळे नेमक किती षटके वाया जातात, हे पहिल्यांदा पाहावे लागले. त्यानंतर ही षटके कशी खेळवायची, याचा विचार पंच आणि सामनाधिकारी करतील. त्यामुळे आता पंच आणि सामनाधिकारी यांची भूमिका या सामन्यात सर्वात महत्वाची ठरणार आहे. पंच आणि सामनाधिकारी यांनी ठरवले तर ही वाया गेलेली षटके चार दिवसांमध्ये विभागून त्यांची भरपाई केली जाऊ शकते. त्यामुळे आता पंच आणि सामनाधिकारी नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. फायनलची आखणी करत असताना आयसीसीने यावेळी सर्वात महत्वाचा निर्णय राखीव दिवसाबाबत घेतला आहे. कारण हा क्रिकेट विश्वातील सर्वात महत्वाचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यातील षटके वाया जाऊ नयेत, यासाठी आयीसीसीने राखीव दिवसाचा उत्तम निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पावसामुळे फायनसचा टॉसही होऊ शकला नाही. त्याचबरोबर भारतीय संघाने यापूर्वीच आपला ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामुळे भारताने आपला संघ जाहीर करण्यात चुक केली, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण आता संघ जाहीर झाला, पण पावसामुळे खेळ सुरु झालेला नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gC7fNh
No comments:
Post a Comment