साउदम्प्टन: यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याला पावसामुळे उशिर होत आहे. इंग्लंडमधील पावसाच्या या स्वभावाबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या विलंबावर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने संताप व्यक्त केला. वाचा- इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने याने गेल्या दोन दिवसांपासून साउदम्प्टन येथे सुरू असलेल्या पावसाबद्दल राग व्यक्त केला. संपूर्ण जग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या अपडेटची वाट पाहत आहे आणि त्यासंदर्भात काहीच बातमी येत नाही. अद्याप टॉस देखील झाला नाही. वाचा- मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि कर्मचारी सामना सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे म्हणत नासिर म्हणाला, इंग्लंडमधील हवामान पावसासाठी बदनाम आहे. या लहरी वातावरणामुळे वेळ वाया जातो आणि खेळ देखील होत नाही, हा सर्व प्रकारच लज्जास्पद आहे. वाचा- गेल्या तीन आठवड्यांपासून इंग्लंडमध्ये स्वच्छ वातावरण आहे. उन पडत आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात क्रिकेट पाहण्यास मुकलोय. आता कुठे खेळ सुरू होणार होता पण या पावसामुळे सर्व बिघडले. इंग्लंडमध्ये आता पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय असे नासिर म्हणाला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या फायनल सामन्यासाठी आयसीसीने एक राखीव दिवस ठेवला आहे. पण हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस साउदम्प्टन येते पावसाची शक्यता आहे. त्यामुळे फायनल सामन्यात किती दिवस प्रत्यक्षात क्रिकेट खेळले जाईल याबाबत शंकाच आहे. पावसामुळे सामना झालाच नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SIDEbM
No comments:
Post a Comment