नवी दिल्ली : फायनल सुरु होण्यापूर्वीच पावसाचा व्यत्यय आला आणि सर्वांनाचा हिरमोड झाला. पण पाऊस पडल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या मनात नेमकं काय चाललं आहे, याबाबत त्याची पत्नी अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्याच्या घडीला चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. पावसामुळे फायनसचा टॉसही होऊ शकला नाही. त्याचबरोबर भारतीय संघाने यापूर्वीच आपला ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामुळे भारताने आपला संघ जाहीर करण्यात चुक केली, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण आता संघ जाहीर झाला, पण पावसामुळे खेळ सुरु झालेला नाही. पावसामुळे खेळ सुरु न झाल्यानंतर विराटच्या मनात नेमकं काय चाललं असेल, याबाबत अनुष्काची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने म्हटले आहे की, " रेन रेन गो अवे, केम अगेन आफ्टर पाईव्ह डेज..." विराटच्या मनात सध्या याच भावना असतील. पाऊस पडायला हवा, पण या पाच दिवसांच्या फायनलनंतर, असंच विराटला सध्यातरी वाटत असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पावसाने अडथळा आणला आहे. यामुळे अद्याप नाणेफेक देखील झालेली नाही. आयसीसीने दिलेल्या अपडेटनुसार पहिल्या सत्राचा खेळ होणार नाही. भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नाणेफेकीचा कौलबाबत फार चांगले रेकॉर्ड नाही. आतापर्यंत तिनही प्रकारात २०० सामन्यात त्याने नेतृत्व केले आहे. त्यापैकी फक्त ८५ सामन्यात विराटने टॉस जिंकला आहे. ११५ सामन्यात नाणेफेकीचा कौल त्याच्या विरुद्ध लागलाय. भारताच्या कर्णधारामध्ये ही सरासरी सर्वात खराब आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cP4g1q
No comments:
Post a Comment