साउदम्प्टन: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रथमच आयोजित झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची प्रतिक्षा मोठ्या कालावधीपासून होती. आता उद्या शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ही लढत होत आहे. इंग्लंडमधील साउदम्प्टन येथे १८ ते २२ जून दरम्यान हे दोन्ही संघ विजेतेपद मिळवण्यासाठी लढतील, जो संघ या सामन्यात विजय मिळवले त्याचे नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहले जाईल. वाचा- फायनल मॅचच्या आधीपासून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. साउदम्प्टन येथे सध्याच्या हवामानानुसार पुढील पाच ही दिवस पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील होणाऱ्या या लढतीच्या पाच पैकी चार दिवस पावसाची शक्यता आहे. आयसीसीने पावसाची शक्यता लक्षात घेऊन २३ जून हा राखीव दिवस ठेवला आहे. पण जर ज्यापद्धतीने पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानुसार फक्त एक राखीव दिवसाने काही उपयोग होणार नाही. वाचा- भीती वाटते कसे असेल हवामान फ्रान्समध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. जे शुक्रवारी उत्तरेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. फक्त पाऊसच नव्हे तर विजांच्या कडकाडासह पाऊस होऊ शकतो. त्याच बरोबर उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार हवा असेल. साउदम्प्टन येथे पुढील काही दिवस असेच हवामान असणार आहे. शुक्रवारी ९० टक्के पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी ४० टक्के, रविवारी पुन्हा जोरदार पाऊस होऊ शकतो. रविवारी ८० टक्के पावसाचा अंदाज आहे. सोमवारी ७० टक्के पावसाची शक्यता आहे. वाचा- आयसीसीने दिलेल्या सहा दिवसांच्या कालावधीत सामन्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्तविजेतेपद दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत किती टक्के पाऊस पडते आणि त्याचा संघांच्या कामगिरीवर कसा परिणाम होतो यावर सामन्याचा निकाल ठरणार आहे. वाचा- गंभीर आरोप
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gyrhbr
No comments:
Post a Comment