नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये भारताचा धडाकेबाज खेळाडू रवींद्र जडेजाला आता विक्रम रचण्याची एक सुवर्णसंधी असेल. या सामन्यात जर जडेजाने दमदार कामगिरी केली तर तो भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्यासारख्या महान अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये स्थान पटकावू शकतो. जडेजाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे, त्याचबरोबर त्याच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले आहे. आता तर जडेजासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण फायनलच्या सामन्यात फक्त काही धावा केल्यावर तो दिग्गज कपिल देव यांच्या यादीत स्थान पटकावणार आहे. सध्याच्या घडीला जडेजाच्या खात्यात १९५४ धावा आहेत आणि २२० विकेट्स आहेत. आता फक्त ४४ धावा केल्यावर जडेजाला एक बहुमान मिळणार आहे. फायनलमध्ये ४४ धावा केल्यावर जडेजाच्या २ हजार धावा पूर्ण होतील. त्यामुळे क्रिकेट विश्वात दोन हजार धावा आणि दोनशेपेक्षा जास्त विकेट्स मिळवणाऱ्या यादीत त्याचा समावेश होणार आहे. या यादीमध्ये आतापर्यंत दिग्गज अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे आता जडेजा ४४ धावा करून हा विक्रम आपल्या नावावर करतो का, याची उत्सुकता सर्वांना असेल. जडेजाचा हा ५२वा कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारताच्या कपिल देव यांनी ५० सामन्यांमध्ये दोन हजार धावा आणि २०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. विक्रम रचण्यासाठी भारताच्या आर. अश्विनला ५२ सामने खेळावे लागले होते. हा विक्रम सर्वात कमी सामन्यांमध्ये इंग्लंडचे माजी क्रिकेटपू इयान बोथम यांनी रचला आहे. बोथम यांनी ४२ सामन्यांमध्ये २००० धावा आणि २०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cNIM5f
No comments:
Post a Comment