साउदम्प्टन: इंग्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघाने २५ खेळाडू नेले आहेत. या दौऱ्यातील पहिली महालढत उद्या १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या फायनलमध्ये कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळते याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. दोन्ही संघांनी १५ जणांची नावे जाहीर केली असून आता त्यातून ११ जण कोणते असतील याचा अंदाज सर्वजण लावत आहेत. वाचा- भारतीय संघाचा विचार केल्यास पहिले सहा खेळाडूंची जाग जवळ जवळ तिच राहणार आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि विकेटकीपर ऋषभ पंत या सहा जणांचे स्थान पक्के आहे. भारतीय संघात खरी चुरस असणार आहे ती अखेरच्या पाच खेळाडूंमध्ये. वाचा- फायनलमध्ये भारतीय संघ चार जलद गोलंदाज खेळवणार की तीन यावर संघात कोणाला स्थान मिळेल आणि कोणाला नाही हे ठरणार आहे. संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे की मोहम्मद सिराजचा संघात समावेश करावा. पण भारत जेव्हा दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरतो तेव्हा संघाच्या विजयाची हमी जवळ जवळ १०० टक्के असते. यामुळे भारत तीन जलद गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. वाचा- आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांची आकडेवारी शानदार आहे. हे दोघे जेव्हा संघात असतात तेव्हा भारताला विजय मिळतोच. जेव्हा जेव्हा अश्विन- जडेजा जोडी संघात असते तेव्हा भारताने ७७ टक्के सामने जिंकले आहेत. या दोघांनी मिळून भारताकडून ३९ कसोटी सामने एकत्र खेळले आहेत. त्यापैकी ३० सामन्यात विजय मिळवला आहे तर फक्त दोन सामन्यात पराभव झालाय. सात सामना ड्रॉ झालेत. या दोघांसह भारताच्या विजयाची टक्केवारी ७६.९२ इतकी होते. त्यामुळेच ही जोडी भारताच्या विजयाची हमी देणारी आहे. वाचा- अश्विन आणि जडेजा यांच्या या कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन फायनल सामन्यात या जोडीला संघात नक्कीच घेईल. इतक नव्हे तर या दोघांना संघाबाहेर ठेवणे धोक्याचे ठरू शकते, याचे कारण म्हणजे गोलंदाजी सोबत फलंदाजीने देखील अश्विन आणि जडेजा योगदान देऊ शकतात. भारताची आघाडीची फळी कोसळली तर हे दोघे डाव संभाळू शकतात. वाचा- न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन नक्कीच याचा विचार करेल आणि तीन जलद गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3xoMlGX
No comments:
Post a Comment