साउदम्प्टन: भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला इंग्लंडमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. असे असले तरी अजिंक्यने एटीगा ते रांची आणि मेलबर्न कसोटीमध्ये ज्या पद्धतीने संकटमोचकाची भूमिका पार पाटली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंड संघासमोर अजिंक्य रहाणेचे सर्वात मोठे आव्हान असेल. वाचा- भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्यला इंग्लंडमधील याआधीची कामगिरी मागे टाकून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. यासाठी अजिंक्य तयार आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडला तेव्हा तेव्हा अजिंक्यने संघाला तारले. इतक नव्हे तर अजिंक्यने शतक झळकावल्यानंतर भारतीय संघाने कधीच सामना गमावलेला नाही. वाचा- भारतीय संघ उद्यापासून न्यूझीलंडविरुद्ध लढत द रोझ बाऊल मैदानावर सुरू होईल. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. भारताच्या अन्य खेळाडूंप्रमाणे अजिंक्यला या कसोटी सामन्याचे महत्त्व अधिक माहिती असेल कारण त्याच्याकडे कसोटीचा स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जाते. वाचा- आमची मोठी जबाबदारी असेल की फलंदाजीत चांगली भूमिका पार पाडणे. फलंदाज हे महत्त्वाचे आहेत. आमच्याकडे वैयक्तीक प्लॉन आहे. मला स्वत:ला वर्तमानात राहण्यास आवडते. जेव्हा आम्ही विजय मिळवत असतो तेव्हा मागील रेकॉर्डचा काही फरक पडत नाही, असे अजिंक्यने म्हटले आहे. वाचा-
अजिंक्यने इंग्लंडमध्ये आतापर्यंत १० कसोटीत ५५६ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. भारताकडून खेळलेल्या ७३ कसोटीत त्याने ४ हजार ५८३ धावा केल्या असून त्यात १२ शतक आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार केल्यास १७ सामन्यात त्याने १ हजार ९५ धावा केल्या असून या काळात त्याने ३ शतक आणि ६ अर्धशतक केली आहेत. ११५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अजिंक्य अव्वल स्थानी आहे. अजिंक्यने भारताबाहेर ४२ कसोटीत ८ शतक, १५ अर्धशतकांसह २ हजार ९७८ धावा केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gy6bdi
No comments:
Post a Comment