साउदम्प्टन: करोना व्हायरसच्या आधी भारतीय संघातील फलंदाजांचा सराव तुम्ही पाहिला असेल तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच जाणवली असेल ती म्हणजे, सपोर्ट स्टाफमधील सदस्य न थांबता बॉलिंग मशिनवर फलंदाजांना चेंडू टाकायचे. ते चेंडू टाकताना वेग सातत्याने बदलत असते. यामुळे फलंदाजांना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा सामना करताना चेंडूच्या वेगात जो बदल व्हायचा त्याची तयारी मिळत. भारतीय संघाने केलेल्या अशा प्रकारच्या सरावाचा फायदा झाला. खेळाडू जलद खेळपट्टीवर फलंदाजी करण्यास तयार झाले. मशीनवर खेळल्यामुळे त्याचे रिफ्लॅक्शन जलद झाले आणि ांना जलद चेंडू त्रासदायक ठरला नाही. पण आता गेल्या काही महिन्यात भारताच्या फलंदाजांना असा सराव मिळाला नाही. इंग्लंडमध्ये गोलंदाजांकडे चेंडू स्विंग करणे आणि सीम ही दोन मोठी शस्त्रे असतात. अशा गोलंदाजीला साथ मिळणाऱ्या साउदम्प्टनच्या द रोझ बाऊल मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत होणार आहे. वाचा- करोनामुळे भारतीय संघाला फार मालिका खेळता आल्या नाहीत. ना त्यांना अशा गोलंदाजांचा सामना करण्याची संधी मिळाली नाही जे चेंडू सीम करू शकतील किंवा लेट स्विंग करू शकतील. यामुळे इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्यास भारतीय फलंदाजांना पुरेसा वेळ मिळाला नाही. भारताचे माजी कर्णधार आणि निवडसमितीचे प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी सराव सामन्यावर भर दिला. मला अश्चर्य वाटले की एकही सराव सामना झाला नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात सराव सामने गरजेचे असतात. वाचा- विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनासाठी ही गोष्टी मोठी डोकेदुखी ठरू शकते. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत न्यूझीलंड भारतासाठी नेहमी त्रासदायक ठरला आहे. आयसीसीच्या स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा २००३च्या वर्ल्डकपमध्ये अखेरचे पराभूत केले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारतीय फलंदाजांची कामगिरी
न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, नील वेगनर, कायले जेमिसन सारखे गोलंदाज आहेत. विराट आणि कंपनीने गेल्या काही महिन्यात कसोटी सामने खेळले नाहीत. ही एक चिंतेची बाब ठरू शकते. WTC मध्ये भारताने १७ सामने खेळले आहेत त्यापैकी १२ मध्ये विजय मिळवला. पण न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. भारताचा ख्राइस्टचर्च आणि वेलिंग्टनमध्ये पराभव झाला होता. अशाच प्रकारच्या परिस्थितीला साउदम्प्टन येथे सामोरे जावे लागू शकते. वाचा- सलामीच्या जोडीवर प्रश्नचिन्ह भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीवर देखील प्रश्नचिन्ह आहे. भारताने अशी जोडी निवडली आहे ज्यांनी इंग्लंडमध्ये कधीच फलंदाजी केली नाही. रोहित शर्माने २०१४ साली इंग्लंडमध्ये फक्त एक कसोटी खेळली होती. तर शुभमन गिल प्रथमच इंग्लंडमध्ये खेळतोय. अन्य कोणतेही खेळाडू संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकू शकले नाहीत. केएल राहुल हा एक पर्याय होता. त्याने २०१८ साली ओव्हर मैदानावर १४९ धावा केल्या होत्या. पण ती कसोटी भारताने गमावली होती. वाचा- इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाज
वेंगसरकरांचा सल्ला रोहित आणि शुभमन यांना इंग्लंडमध्ये डाव सुरू करण्यात कोणताही त्रास होणार नाही. त्यांनी गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. तेच माझी पहिली पसंद आहेत, असे सांगत वेंगसरकर म्हणाले, फलंदाजांनी साइड ऑन रहावे आणि चेंडू थोडा उशिरा खेळावा. जर चेंडू लेट स्विंग होत असेल तर तुम्हाला मदत मिळले. या उटल सुरुवातीलाच मोठे ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केल्यास बॅटला चेंडूचा स्पर्श होईल आणि तो गली किंवा स्लिपमध्ये जाऊ शकतो. वाचा- काही दिवसांपूर्वी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने देखील तुम्ही जितके सरळ आणि शरीराच्या जवळ खेळेल तितके चांगले ठरले असे म्हटले होते. हनुमा विहारी गेल्या काही काळापासून इंग्लंडमध्ये आहे.तो वॉरविकशरकडून काउंटी क्रिकेट खेळत होता. त्याचा संघात सहावा गोलंदाज म्हणून समावेश करता येऊ शकेल. वेंगसरकरांनी विहारी एक चांगला पर्याय ठरू शकतो असे म्हटले. अखेर भारतीय संघाची फलंदाजी ही चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर अवलंबून असेल. या तिघांनी इंग्लंडमध्ये शतक झळकावले आहे. रहाणे आणि पुजारा यांना काउंटी क्रिकेटचा देखील अनुभव आहे. याच्यासह ऋषभ पंत देखील आहे ज्याने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून दिली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pY0BDU
No comments:
Post a Comment