मुंबई: साउदम्प्टन येथील भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यावर संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर आहे. कसोटी क्रमवारीतील क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या संघात ही लढत होणार आहे. या ऐतिहासिक लढतीबाबत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सुनावले आहे. वाचा- भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ अनेक कसोटी मालिका खेळून फायनल सामन्यात पोहोचले आहे. जर आयसीसीने फायनल देखील एका मालिके प्रमाणे खेळवला असता तर चांगले झाले असते. जर त्यांना फायनल मॅच फक्त एका सामन्याची खेळवायची असेल तर यापुढे ज्या कसोटी मालिका एक सामन्याच्या असतील त्याचा समावेश WTCमध्ये करावा, असा शब्दात सचिनने आयसीसीला सुनावले. वाचा- जर एखाद्या कसोटी मालिकेत तीन, चार किंवा पाच कसोटी सामने असतील तर त्या मालिकेतील एक मॅचचा समावेश WTCमध्ये केला जावा. अन्य सामन्यांना त्याच्यापासून वेगळ ठेवावे. पण जर तुम्ही संपूर्ण मालिकेचा विचार WTCसाठी करणार असाल तर फायनल मॅच देखील मालिकेच्या स्वरुपात झाली पाहिजे. मी ही गोष्ट समजू शकतो की आजकल अधिक सामने होत आहेत आणि त्यामुळे मालिकांसाठी वेळ मिळत नाही. वाचा- इंग्लंडमधील परिस्थितीत कसे खेळावे? इंग्लंडमधील परिस्थितीचा खुप फरक पडतो असे सांगत सचिनने जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा लाल सिग्नल दिसल्यावर तुम्हाला गाडी थांबवावी लागते आणि ग्रीन सिग्नल दिसल्यावर तुम्ही पुढे जाता. कसोटी सामना देखील असाच असतो. जर ढगाळ वातावरण असेल आणि खेळपट्टी ओलसर असेल तर संभाळून खेळावे लागले. एकदा का तुम्ही सेट झाला तर जलद गोलंदाजांचा सहज सामना करू शकता. अंतिम सामन्यात याचा मोठा फरक पडले. खेळाडूंना परिस्थितीनुसार बदल करावा लागले. वाचा- विराटने टॉस जिंकल्यास काय करावे? नाणेफेकीबद्दल बोलताना सचिनने पुन्हा तेव्हाची परिस्थिती असे उत्तर दिले. जर खेळपट्टी ओलसर असेल किंवा ढगाळ वातावरण असेल तर प्रथम गोलंदाजी घेणे फायदेशीर ठरले. या उटल हवामान स्वच्छ असेल तर प्रथम फलंदाजी करणे उत्तम ठरेल. वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vBZvza
No comments:
Post a Comment