नवी दिल्ली : फानयलबाबात आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. फायनल्याच्या यापुढील दोन दिवसांमध्ये वातावरण कसे राहील आणि पाऊस पडणार की नाही, याबाबतचे अपडेट्स आता समोर आले आहेत. आजचा दिवस पावसाने गाजवला आणि चाहत्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. पण यानंतरच्या दोन दिवसांमध्ये हवामान खेळासाठी चांगले राहणार असल्याचे बीबीसी या वृत्तवाहीनीने आता सांगितले आहे. त्यामुळे आजचा काही वेळ पावसामुळे वाया गेला असला तरी उद्या आणि परवा खेळ होईल, असे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सामन्याची रंगत अजूनच वाढणार आहे. आता पावसामुळे मैदानाचे किती नुकसान झाले आहे, हे पहिल्यांदा पाहिले जाईल. कर्मचारी पहिल्यांचा मैदान सुकवण्याचा प्रयत्न करतील. मैदान सुकवल्यावर खेळपट्टीची स्थिती नेमकी कशी आहे, हे पाहिले जाईल. जर मैदान जास्त निसरडे झाले नसेल तर लवकर सामना सुरु केला जाऊ शकतो. पण जर मैदानात जास्त पाणी असेल तर पावसानंतर ६० ते ९० मिनिटे सामना सुरु व्हायला लागू शकतात. त्यामुळे पाऊस थांबल्यावर मैदानाची परिस्थिती नेमकी कशी आहे, याचा अंदाज येणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे पावसामुळे मैदानाचे किती नुकसान झाले आहे आणि मैदान खेळण्यायोग्य आहे की नाही, याची खातरजमा पंच आणि सामनाधिकारी यांनी करावी लागेल. आजच्या दिवशी पुन्हा पावसाने हजेरी लावली नाही आणि मैदानातील पाणी कमी करण्यात यश आले तर किमान ३० ते ३५ षटकांचा खेळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयसीसीने दिलेल्या अपडेटनुसार काही वेळातच अंपायर आणि ग्राउंडमॅन यांच्यात चर्चा होईल. त्यानंतरच आज सामना होणार की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल. भारतीय संघातील खेळाडू आर अश्विन, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी मैदानाचा फेरफटका मारला. न्यूझीलंडचा खेळाडू कायले जेमिन्सनने देखील सीमारेषेवरून मैदान असे आहे याचा आढावा घेतला. सामना सुरू होण्यासाठी कर्मचारी मैदान सुख करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता दोन्ही संघांना प्रथम फलंदाजी करण्याची इच्छा असले. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या पाच दिवसात जितका वेळ वाया जाईल तो खेळ सहाव्या दिवशी म्हणजेच २३ जून रोजी खेळवला जाईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vAPfH5
No comments:
Post a Comment