साउदम्प्टन: फायनलच्या पहिल्याच दिवशी पावसाने चांगलाच गोंधळ घातला आणि त्यामुळे पहिले सत्र वाया गेले. त्यानंतर काही काळासाठी पाऊस थांबला होता आणि मैदानातील पाणी बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले होते. पण आता आजच्या दिवसाचा खेळ होणार की नाही, याबाबतचे अपडेट्स आता आले आहेत. फायनलच्या पहिल्या दिवशी खेळ होणार की नाही, याबाबतचे मोठे अपेट्स आता आले आहेत. पावसामुळे पहिल्याच दिवसाचा जवळपास अडीच तासांचा खेळ वाया गेला होता. त्यानंतर पंच आणि सामनाधिकारी यांनी मैदानाची पाहणी केली आणि त्यानंतर आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता उद्या दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यावेळी नाणेफेकीचा कौल घेतला जाईल आणि सामना सुरु करण्यात येईल, असे समजते आहे. गुरुवारी भारतीय संघाने आपल्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. संघात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आलाय. यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसू शकतो. खेळपट्टी ओली असल्याने चेंडू जास्त वळणार नाही आणि फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी करणे अवघड होईल. भारताकडे तीन जलद गोलंदाज आहेत जे वेगवान खेळपट्टीवर कमाल करू शकतील. अश्विनने इंग्लंडमध्ये आतापर्यंत ६ कसोटीत १४ विकेट घेतल्या आहेत. जडेजाने ५ कसोटीत १६ विकेट घेतल्या आहेत. अश्विन आणि जडेजा ही जोडी कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतरची ही दुसरी यशस्वी जोडी मानली जाते. त्यामुळे ही जोडी आता नेमकी काय कमाल करते, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. सध्याच्या घडीला पावसामुळे थंड वातावरण आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळू शकते, असे म्हटले जात आहे. पण अश्विन आणि जडेजा यांच्यांकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे ही जोडी नेमकी काय कमाल करते, हे पाहावे लागेल. भारतीय संघात मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा आणि इशांत शर्मा या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gH9rSu
No comments:
Post a Comment