नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. असोसिएशनच्या सर्वोच्च समितीने बुधवारी अझरविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वाचा- भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अझरचा समावेश सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत होतो. कारणे दाखवा नोटीशीमध्ये, तुमच्या विरुद्ध अनेक सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यावर विचार केल्यानंतर ही नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला गेलाय, असे म्हटले आहे. वाचा- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अझरवर अन्य काही आरोप देखील करण्यात आले आहेत. वाचा- अझरने भारताकडून ९९ कसोटी सामन्यात ४५.०३च्या सरासरीने ६ हजार २१५ धावा केल्या आहेत. यात २२ शतक आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेत त्याने ३३४ सामन्यात ७ शतक आणि ५८ अर्धशतकांसह ९ हजार ३७८ धावा केल्यात. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणातील सलग तीन सामन्यात शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2S7QHmS
No comments:
Post a Comment