नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीच गाजवणार, असे मत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. हे सांगत असताना गावस्कर यांनी याबाबतचे एक मोठे कारणही दिले आहे. सुनील गावस्कर यांनी नेमकं काय सांगितलं, पाहा...सुनील गावस्कर यांनी यावेळी इंग्लंडच्या गेल्या दौऱ्याचा उल्लेख केला आहे. गावस्कर यांनी सांगितले की, " भारतीय संघ जेव्हा गेल्यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा भारताकडून विराट कोहलीने दमदार कामगिरी केली होती. कोहली हा फलंदाजी करत असताना चेंडूची वाट पाहतो आणि हीच गोष्ट कोहलीला इंग्लंडमध्ये सर्वात जास्त उपयोगी ठरणार आहे. कारण इंग्लंडमध्ये खेळत असताना तुम्ही चेंडूवर न जाता जेवढे संयमपणे खेळाल तेव्हा तुमच्या जास्त धावा होऊ शकतात. त्यामुळे कोहली विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करेल, अशी आशा मला आहे. इंग्लंडच्या गेल्या दौऱ्यात कोहलीला शतक झळकावता आले नव्हते, पण त्याने ६० धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली होती. चेंडू नेमका कसा येईल, हे कोहलीचा चांगले माहिती असते आणि याचा फायदा त्याला फलंदाजी करताना होत असतो." गावस्कर यांनी पुढे सांगितले की, " सध्याच्या घडीला वनडे क्रिकेट हे सर्वात जास्त खेळले जाते. वनडे क्रिकेटमध्ये फलंदाज हा उसळत्या चेंडूंचा सामना करायला जातो. पण जिथे चेंडू स्विगं होतो तिथे काही फटके खेळण योग्य ठरत नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना प्रत्येक खेळाडूने विचार करायला हवा. त्याचबरोबर रोहित शर्माने इंग्लंडमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, याचा फायदा त्याला या फायनलमध्येही होऊ शकतो." गावस्कर यांनी सांगितले होते की, " या फायनलमध्ये भारताचा कर्णधार कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन यांच्यामध्ये चांगले युद्ध पाहायला मिळेल. त्याचबरोबर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्यामध्येही कडवी झुंज पाहायला मिळू शकते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gB8Otu
No comments:
Post a Comment