दुबई: भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत काही तासांवर आली आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर या लढतीवर लागली असून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच चॅम्पियन संघ मिळणार आहे. या लढतीची तयारी दोन्ही संघ जोरदार करत आहेत. दोन्ही संघांचे कर्णधार विराट कोहली आणि यांच्या कामगिरीवर सर्वांची खास नजर असेल. वाचा- साउदम्प्टन येथे होणाऱ्या लढतीसाठी काही तास शिल्लक असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटीमधील फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याला मोठा धक्क बसला आहे. क्रमवारीत गेल्या काही आठवड्यांपासून अव्वल स्थानावर असलेल्या केनला मागे टाकत ऑस्ट्रेलियाच्या ने पहिले स्थान मिळवले. वाचा- क्रमवारीत स्मिथ ८९१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर केन ८८६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन ८७८ गुणांसह तिसऱ्या तर भारताचा कर्णधार विराट कोहली ८१४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत तसेच सलामीवीर रोहित शर्मा यांचा समावेश आहे. पंत आणि रोहित ७४७ गुणांसह संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहेत. वाचा- वाचा- कसोटी क्रमवारी आघाडीचे १० फलंदाज १) स्टीव्ह स्मिथ २) केन विलियमसन ३) मार्नस लाबुशेन ४) विराट कोहली ५) जो रुट ६) ऋषभ पंत ७) रोहित शर्मा ८) हेन्नी निकोल्स ९) डेव्हिड वॉर्नर १०) बाबर आझम
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35sWsyC
No comments:
Post a Comment