साउदम्प्टन: १८ जूनपासून बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या लढतीसाठी दोन्ही संघांनी १५ जणांच्या नावाची घोषणा केली आहे. वाचा- भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यासाठी २५ खेळाडू नेले आहेत. त्यापैकी १५ जणांची निवड WTC फायनलसाठी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार फायनल सामन्यासाठी ज्या खेळाडूंची निवड संघात करण्यात आली आहे फक्त त्याच खेळाडूंना साउदम्प्टन येथील हॉटेलमध्ये थांबता येणार आहे. आयसीसीच्या या नियमामुळे भारतीय संघातील नऊ खेळाडूंना साउदम्प्टन सोडावे लागले. वाचा- भारताचे खेळाडू केएल राहुल, मयांक अग्रवाल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान अर्जन नागवासवाला यांना त्यांच्या कुटुंबासह लंडन येथे पाठवण्यात आले आहे. वाचा- फायनल सामन्यासाठी निवडण्यात आलेला संघ रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RYF3ui
No comments:
Post a Comment