साऊदम्प्टन: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आधी भारतीय संघातील खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. भारतीय संघातील खेळाडूंनी दोन गटात तीन दिवसांचा सराव सामना खेळला. सराव सामन्यात भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याने झळकावलेल्या शतकाचे सर्वांनी कौतुक केले. वाचा- पंत पाठोपाठ भारताचा ऑलराउंडर रविंद्र जडेजाने देखील धमाकेदार कामगिरी केली आहे. बीसीसीआयने जडेजाच्या स्फोटक अर्धशतकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जडेजाने सराव सामन्यात ७६ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. वाचा- जडेजाच्या या कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. रोहित शर्माने ८०हून अधिक, केएल राहुलने शतक, पंतने ९४ चेंडूत नाबाद १२१, शुभमन गिलने ८५ धावा करत फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिलेत. वाचा- गोलंदाजीत आतापर्यंत इशांत शर्मा, मोहम्मद सिराज यांनी प्रभावी कामगिरी केल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. वाचा- दरम्यान न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाचे टेन्शन वाढवले आहे. त्यांनी आयसीसी क्रमवारीत भारताला मागे टाकत पहिले स्थान मिळवले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3glmyd9
No comments:
Post a Comment