साऊदम्प्टन: भारत आणि न्यूजीलंड यांच्यात १८ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. प्रथमच होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या या ऐतिहासिक फायनल लढतीबद्दल क्रिकेट चाहते आणि माजी दिग्गज खेळाडू त्यांची मते व्यक्त करत आहेत. सध्या सर्वजण या ऐतिहासिक फायनल सामन्याची चर्चा करत आहेत. वाचा- जेतेपदाची लढत त्यातही फक्त एकच कसोटी सामना यामुळे विजय होणार होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. सामन्याचा निकाल लागले का नाही लागला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाणार आहे. अशात साऊदम्प्टनच्या द रोझ बाऊल मैदानाची खेळपट्टी कशी असेल याची उत्सुकता सर्वांना आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल असे बोलले जात आहे. यासंदर्भात साऊदम्प्टनचे पिच क्यूरेटरने या ऐतिहासिक फायनल मॅच संदर्भात मोठा खुलासा केलाय. वाचा- हॅम्पशायरचे हेड ग्राउंसमॅन सायमन ली यांनी सांगितले की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठीचे पिच हे वेगवान आणि बाऊंसला मदत करणारे असले. आम्ही असा प्रकारचे पिच तयार करत आहोत ज्यावर फलंदाज आणि गोलंदाज या दोघांना मदत मिळेल. क्यूरेटरने सांगितले की, खेळपट्टीवर फिरकीपटूंना देखील मदत होईल. भारत आणि न्यूझीलंड याच्यातील लढतीसाठी इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे पिच तयार करणे कठीण काम आहे. आयसीसीच्या नियमांचे पालन करून आम्ही एक चांगली खेळपट्टी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यामुळे दोन्ही संघांमधील लढत बरोबरीची होईल. वाचा- मला वैयक्तीक विचाराल तर मी असे पिच तयार करू इच्छीतो की ज्यात वेग आणि चेंडू बाऊंस होईल. ली म्हणाले, इंग्लंडमध्ये असा प्रकारचे पिच तयार करणे अवघड असते. कारण येथे हवामान साथ देत नाही. पण या सामन्यासाठी चांगली बातमी आहे. अधिक वेळ उन असेल आणि अपेक्षा आहे की वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल आणि अधिक रोलर चालवण्याची गरज लागणार नाही. दोन्ही संघांकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत. सामन्याच्या प्रत्येक क्षणी त्यांचा प्रभाव दिसावा अशी ली यांची इच्छा आहे. वेगवान लाल चेंडू क्रिकेटला अधिक रोमांचक करतो. मी क्रिकेटचा चाहता आहे आणि असे पिच तयार करू इच्छीतो की ज्यावर क्रिकेट प्रेमी प्रत्येक चेंडूचा आनंद घेईल. मी ती फलंदाजी असो की गोलंदाजी. वाचा- जर गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात कौशल्याची लढत झाली तर एक मेडन ओव्हर देखील रोमांचक होऊ शकते. भारताच्या फिरकीपटू पारडे जड आहे त्यांच्याकडे आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे दोन गोलंदाज आहेत. सामना प पुढे घेऊन जाण्यात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील, असे ली म्हणाले. मी जसे याआधी सांगितले की, हवामान चांगले असेल असा अंदाज असल्याने विकेट लवकर कोरडे होईल. त्यामुळे चेंडू स्पिन होण्यास मदत मिळेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gm60BD
No comments:
Post a Comment