साऊदम्प्टन: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून भारतीय संघाला जेतेपद मिळवण्याची संधी आहे. या सामन्यासाठी खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. वाचा- भारतीय संघाने साऊदम्प्टन येथे इंट्रा स्क्वॉड प्रॅक्टिस मॅच खेळली. भारतीय खेळडूंच्या दोन संघात झालेल्या या सामन्यात फलंदाजा आणि गोलंदाजांनी जोरदार सराव केला. वाचा- या सराव सामन्यात , केएल राहुल यांनी शतक तर शुभमन गिल, रविंद्र जडेजा यांनी अर्धशतकी खेळी केली. सामन्यात जेव्हा शार्दुल ठाकूरच्या फलंदाजीचा नंबर आल्या त्यानंतर दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दुल थेट नेट्सकडे गेला. यावर पंतने रवी शास्त्रींना विचारले, रवी भाई, तो बघा सरळ नेटकडे जात आहे. यावर सर्व खेळाडू हसू लागले. वाचा- सराव सामन्यात अखेरच्या दिवशी रविंद्र जडेजाने ७६ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर सिराजने २२ धावात दोन विकेट घेतल्या. त्याआधी पंतने ९४ चेंडून नाबाद १२१ धावा केल्या. तर सलामीवीर शुभमन गिलने ८५ धावा केल्या होत्या. अनुभवी इशांत शर्माने पहिल्या दिवशी ३ विकेट घेऊन फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले होते. वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल आधी न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आणि आयसीसी क्रमवारीत भारताला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2TotME2
No comments:
Post a Comment