साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ही कसोटी ड्रॉ झाली तर दोन्ही संघ संयुक्त विजेते होतील. नाही तर कसोटी क्रिकेटला पहिला चॅम्पियन मिळेल. वाचा- टेस्ट चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारताच्या एका खेळाडूने पहिले स्थान मिळवले आहे. भारताचा दिग्गज खेळाडू रविंद्र जडेजाने कसोटी क्रमवारीत ऑलराउडरमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. जडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. वाचा- ताज्या क्रमवारीनुसार सर जडेजाकडे ३८६ गुण तर होल्डरकडे ३८४ गुण आहेत. या क्रमवारीत इंग्लंडचा बेन स्टोक्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे ३७७ गुण आहेत. भारताचा फिरकीपटू आर अश्विन ३५३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर आहे. वाचा- फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन दुसऱ्या, मार्नस लाबुशेन तिसऱ्या तर विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. वाचा- WTC फायनलमध्ये आतापर्यंत झालेल्या खेळात अश्विनने दोन विकेट तर जडेजाने एक विकेट घेतली आहे. फलंदाजांमध्ये विराटने पहिल्या डावात ४४ तर केनने ४९ धावा केल्या होत्या. वाचा- गोलंदाजांच्या क्रमवारीत पॅट कमिंन्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचे ९०८ गुण आहेत. तर अश्विन ८५० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qm2sm4
No comments:
Post a Comment