लंडन: इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाकडे असा एक खेळाडू आहे जो संपूर्ण २४ सदस्यीय भारतीय टीमला मार्गदर्शन करू शकतो. हे वाचल्यानंतर तुमच्या समोर कसोटी क्रिकेटमधील अनुभवी चेतेश्वर पुजार किंवा अजिंक्य राहणे नसले तर किंवा रोहित शर्मा यांची नावे आली असतील. वाचा- भारतीय खेळाडू मुंबई १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून गुरुवारी लंडनमध्ये दाखल झाले. पण भारतीय संघातील एक खेळाडू असा होता जो गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळतोय. भारतीय संघातील मधळ्या फळीतील फलंदाज गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंडमध्ये आहे. तो काउंटी क्रिकेट खेळतोय. वाचा- विहारी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याचा सल्ला भारतीय संघाला फार उपयोगी पडू शकतो. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल आधी विहारीचा ड्यूक बॉलने चांगला सराव झाला आहे. इंग्लंडमधील वातावरणाशी त्याने आता जुळवून घेतल्याने अंतिम ११ मध्ये त्याचे स्थान निश्चितपणे असेल. वाचा- काउंटी क्रिकेट खेळण्याआधी विहारीने ऑस्ट्रेलियात कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियात वापरला जाणारा कुकाबरा चेंडू पेक्षा ड्यूक बॉलवर गोलंदाजांना थोडीफार मदत मिळते असे विहारी म्हणाला. काही वेळेनंतर कूकाबरा चेंडू थोडा सौम्य होतो. पण ड्यूक बॉल बाबत तसे होत नाही. वारा असला तरी या चेंडूने गोलंदाजांना मदत मिळते. त्याच बरोबर खेळपट्टीवर टप्पा पडल्यानंतर गोलंदाजांनी मदत मिळते. वाचा- दिवसभर ड्यूक बॉलने गोलंदाजांना मदत मिळत असल्याने तेच सर्वात मोठे फलंदाजीचे आव्हान आहे. जेव्हा उन असते तेव्हा फलंदाजी करणे सोपे असते. पण ढग आल्यानंतर चेंडू हलतो. यासत्राच्या सुरुवातीला मी त्याचा सामना केला. काउंटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात २३ चेंडू खेळल्यानंतर मी शून्यावर बाद झालो. इंग्लंडमध्ये शॉटची निवड करताना फार विचार करावा लागतो. भारतात जर तुम्हाला चेंडू ड्राइव्ह करता येत नसेल तर तुम्ही चेंडू पुश करू शकता. पण इंग्लंडमध्ये असे करता येत नाही. तुम्हाला चेंडू जास्ती जास्त उशिरा खेळावा लागतो, असे विहारी म्हणाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3potucm
No comments:
Post a Comment