मुंबई: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ सहा कसोटी सामने खेळणार आहे. यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा समावेश आहे. वाचा- भारतीय संघ १८ जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध WTC फायनलमध्ये खेळले. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताच्या या इंग्लंड दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. या दौऱ्यात भारताची कामगिरी कशी होईल याबद्दल सुनिल गावस्कर यांनी त्याचे मत सांगितले. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ४-० असा विजय होईल. द टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत गावस्कर म्हणाले, टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यांच्यात सहा आठवड्यांचे अंतर आहे. त्यामुळे भारतीय संघावर WTC फायनलच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये होणारी ही मालिका भारत ४-०ने स्वत:च्या नावावर करेल. वाचा- इंग्लंडविरुद्ध भारताचे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या गावस्करांनी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलबद्दल सांगितले की, जून महिन्यात चेंडू वेगाने मूव्ह करले. अशात दोन्ही संघांच्या फलंदाजांची परीक्षा असेल. कारण या दोन्ही संघात सर्वोत्तम जलद गोलंदाज आहेत. वाचा- गावस्करांशिवाय अन्य काही दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा विजेता कोण होईल याबद्दल मत व्यक्त केले आहे. काहींच्या मते न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असल्याने त्यांना भारताविरुद्धच्या फायनलमध्ये फायदा होईल. या उटल भारतीय संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे न्यूझीलंडला विजय मिळण्याची शक्यता अधिक आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34KvaTZ
No comments:
Post a Comment