साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ पावसामुळे वाया गेलाय. पहिले सत्र वाया गेल्यानंतर काही वेळासाठी पावसाने विश्रांती घेतली होती. पण पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. अशातच भारतीय संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. वाचा- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस साउदम्प्टन येथे पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे खेळपट्टी ओली असेल. अशा परिस्थितीत जलद गोलंदाजांचा मारा हा अधिक प्रभावी ठरले. खेळपट्टीत फिरकी गोलंदाजांना फारसा वाव असणार नाही. भारतीय संघाने फायनल मॅच साठी कालच अंतिम ११ जणांची घोषणा केली आहे. यात विराटने तीन जलद गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंना स्थान दिले आहे. वाचा- भारतीय संघात रविंद्र जडेजा आणि आर अश्विन हे दोन फिरकीपटू तर मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तीन जलद गोलंदाज असतील. अद्याप टॉस देखील झाला नाही आणि भारताच्या संघ निवडीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पावसाचे वातावरण आणि खेळपट्टी यामुळे भारतीय संघ निवडीवर टीका होत असताना कर्णधार विराटसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. वाचा- टीम इंडिया अजून देखील संघात बदल करू शकतो. याचा अर्थ भारताला अंतिम ११ संघात काही खेळाडूंना बाहेर बसवून नव्या खेळाडूंना घेता येऊ शकते. आयसीसीच्या नियमानुसार जोपर्यंत नाणेफेक होत नाही तोपर्यंत संघात बदल करण्याची परवानगी असते. त्यामुळे मैदानातील परिस्थिती पाहता भारत चार गोलंदाजांना संघात स्थान देऊ शकतो. अशा परिस्थितीत जडेजा अथवा अश्विनला संघाबाहेर बसवावे लागले. वाचा- अर्थात कर्णधार विराट आणि संघ व्यवस्थापन असा निर्णय घेतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. न्यूझीलंड संघाने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघ मोहम्मद सिराजला संघात संधी देऊ शकतो. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cRKLp9
No comments:
Post a Comment