नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलला सुरुवात होण्यापूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या कर्णधारांना मोठा धक्का बसल्याचेही समोर आले आहे. नेमकं घडलं तरी काय, पाहा...फायनल सुरु होण्यापूर्वी आयसीसीने आपली कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदजांच्या यादीमध्ये कोहलीला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय संघ गेले काही दिवस कसोटी सामने खेळलेला नाही, पण तरीही कोहलीच्या क्रमवारीत वाढलेली पाहायला मिळाली आहे. कारण कोहलीने या क्रमवारीत चौथे स्थान पटकावले आहे. त्यामुळे फायनलपूर्वी कोहलीला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा कर्णधार जो रुटला चांगली फलंदाजी करता आलेली नव्हती. त्यामुळे त्याच्या कसोटी क्रमवारीतील स्थानात घसरण झाली असून याचा फायदा आता कोहलीला मिळाला आहे. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार रुटसाठी हा एक मोठा धक्का असेल. आयसीसीच्या क्रमवारीत आता न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनलाही मोठा धक्का बसला आहे. कारण केन हा क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. पण इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळला नव्हता. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. आता अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच जाही करण्यात आलेल्या आयसीसीच्या क्रमवारीत स्मिथ ८९१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर केन ८८६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन ८७८ गुणांसह तिसऱ्या तर भारताचा कर्णधार विराट कोहली ८१४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या दहा खेळाडूंमध्ये भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत तसेच सलामीवीर रोहित शर्मा यांचा समावेश आहे. पंत आणि रोहित ७४७ गुणांसह संयुक्तपणे सहाव्या क्रमांकावर आहेत. आयसीसी क्रमवारीतील अव्वल १० फलंदाज पुढील प्रमाणे१) स्टीव्ह स्मिथ २) केन विलियमसन ३) मार्नस लाबुशेन ४) विराट कोहली ५) जो रुट ६) ऋषभ पंत ७) रोहित शर्मा ८) हेन्नी निकोल्स ९) डेव्हिड वॉर्नर १०) बाबर आझम
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gC3pCC
No comments:
Post a Comment