नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील फायनलबाबत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आता एक मोठा खुलासा केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरने कोणत्या संघाचे पारडे सध्याच्या घडीला जड दिसत आहे, याबाबत भाष्य केले आहे. सचिनने नेमका कोणता मोठा खुलास केला, पाहा...फायनलबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला की, " भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनल होणार आहे, हे यापूर्वीच ठरलेल होते. पण त्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका कशी खेळवण्यात आली. जर ही मालिका खेळवायची होती, तर ती फायनलपूर्वी खेळवायला हवी होती. त्यामुळे या कसोटी मालिकेचा फायदा न्यूझीलंडच्या संघाला भारताविरुद्धच्या सामन्यात मिळू शकतो. कारण इंग्लंडमध्ये त्यांनी दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यांनी ही मालिका जिंकली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तर न्यूझीलंडचे पारडे हे भारतापेक्षा जड वाटत आहे. कारण भारतीय संघाला इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर आपल्या संघातील खेळाडूंबरोबर सामना खेळायला मिळाला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला जर दोन्ही संघांकडे पाहिले तर नक्कीच भारतापेक्षा न्यूझीलंडचा संघ वरचढ दिसत आहे. पण भारतीय संघ हा चांगलाच तुल्यबळ आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार होईल, असे मला वाटते." सचिनने पुढे सांगितले की, " इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये जी कसोटी मालिका खेळवली गेली, त्याचा फानयलशी कोणताही संबंध नव्हता. कारण फायनल कोणत्या संघांमध्ये होणार, हे फार पूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ही मालिका खेळवण्यात आली आहे. या गोष्टीचा फायदा न्यूझीलंडला होऊ शकतो. पण दुसरीकडे भारताच्या संघाल कमी लेखून चालणार नाही. कारण आतातपर्यंत त्यांनी सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे फायनलचा सामना हा चांगलाच रंगतदार होईल, अशी आशा मला आहे." जर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये फायनल ठरली होती तर त्यानंतर त्यांची इंग्लंडबरोबर मालिका का खेळवण्यात आली, हा प्रश्नही चाहत्यांना पडलेला आहे. पण या मालिका विजयाचा त्यांना जास्त फायदा होणार नाही, असे चाहत्यांना वाटत आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zt4WU4
No comments:
Post a Comment