साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून येथील द रोझ बाऊल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या एतिहासिक सामन्याची सर्व क्रिकेट विश्वाला प्रचंड उत्सुकता आहे. दोन्ही संघांची आणि खेळाडूंची कामगिरी कशी होईल यासंदर्भात दिग्गज खेळाडूंपासून ते सर्व सामान्य क्रिकेट चाहते अंदाज व्यक्त करत आहेत. अशात या बहुप्रतिक्षित सामन्याआधी चाहत्यांसाठी एक वाइट बातमी आली आहे. वाचा- घोषणा WTC फायनलसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आणि आयसीसी कसोटी क्रमवारीत त्यांनी भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. दुसरीकडे भारताने देखील गेल्या काही दिवसात जोरदार तयारी केली आहे. खेळाडूंचे दोन गट करून तीन दिवसांचा सराव सामना खेळला. वाचा- फायनल सामन्याआधी इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉटी पानेसरने सोशल मीडियावर एक ट्विट पोस्ट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने साउदम्प्टनमधील हवामानाची माहिती दिली आहे. पानेसरने हवामानाचा जो रिपोर्ट शेअर केल्या आहे, त्यानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या पाच दिवसात ७० ते ८० टक्के पाऊस पाडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यात आयसीसीने २३ जून हा जो राखीव दिवस ठेवला आहे त्याचा देखील समावेश आहे. वाचा- हवामान विभाग आणि एक्यू वेदर ने दिलेल्या अंदाजानुसार साउदम्प्टन येथे १७ आणि १८ जून रोजी ८० टक्के पावसाची शक्यता आहे. दोन दिवस विजेच्या कटकटाटासह पाऊस होऊ शकतो. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील ढगाळ वातावरण असेल आणि दीड तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामना ज्या पाच दिवसात होणार आहे १८ ते २२ जून या काळता प्रत्येक दिवशी अधून मधून पाऊस पडू शकतो. वाचा- पावसाचा अडथळा फक्त फायनल मॅच दरम्यान नाही तर सामन्याच्या एक दिवस आधी दोन्ही संघांच्या सरावात खो घालू शकतो. जर १७ जूनच्या रात्री साउदम्प्टनमध्ये पाऊस पडला तर त्याचा परिणाम आउटफिल्ड आणि पिचवर होऊ शकतो. यामुळे विराट कोहली आणि केन विलियमसन यांना त्याच्या रणनितीत बदल करावा लागू शकतो. वाचा- जर हवामान ठिक झाले तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. भारताकडे आर अश्विन आणि रविंद्र जडेजा असे दोन चांगले फिरकीपटू आहेत. भारतीय संघ ३ जलद गोलंदाज आणि २ फिरकीपटूंना संघात स्थान देऊ शकतो. या उटल परिस्थिती असेल तर विराट कोहली चार जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांना स्थान देऊ शकतो.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35mSGXn
No comments:
Post a Comment