मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार त्याची मते स्पष्टपणे मांडतो. बुधवारी रात्री इंग्लंडला रवाना होण्याआधी ऑनलाइन पत्रकार परिषदेत विराटने त्याचे मत सांगितले. वाचा- इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ सर्व प्रथम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. या सामन्याबद्दल सर्वजण एकच चर्चा करत आहेत ती म्हणजे भारतीय संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. या उटल न्यूझीलंड संघ मात्र इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे पारडे WTC फायनलमध्ये जड असेल. यासंदर्भात विराटला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्याने रोखठोक मत व्यक्त केले. वाचा- जर तुम्हाला वाटत असेल की फायनल मॅचमध्ये न्यूझीलंडचे पारडे जड आहे तर तुम्ही विमानात बसू नका. विराटच्या मते, दोन्ही संघ बरोबरीत आहेत. टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एका संघाला मजबूत म्हणणे योग्य ठरणार नाही. वाचा- विमानात बसण्याआधी असा विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टीत आम्ही न्यूझीलंडच्या बरोबरीचे आहोत, असे विराटने सांगितले. तोच संघ विजय होणार जो विजयाच्या मानसिकतेत असेल. प्रतिस्पर्धी संघाच्या दबावात येण्याची गरज नाही. विराटने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे स्पष्ट केली की भारतीय संघ इंग्लंडमध्ये विजयाच्या इराद्याने जात आहे. फायनल सामन्यात दोन्ही संघ बरोबरीवर आहेत. वाचा- वाचा- भारतीय संघ बुधवारी रात्री इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंडमध्ये क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघ सराव करू शकेल. १८ ते २२ जून या कालावधीत ते न्यूझीलंडविरुद्ध WTC फायनल खेळतील. त्यानंतर ४ ऑगस्टपासून न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uHjr2R
No comments:
Post a Comment