मुंबई: भारतीय क्रिकेट संघ बुधवारी रात्री इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी भारताचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. विराटने इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या WTC फायनलचा कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. तर शास्त्रींनी देखील त्यांचे मत व्यक्त केले. पण या दोघांची ही पत्रकार परिषद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. वाचा- ऑनलाइन पत्रकार परिषद सुरू होण्याआधी विराट कोहली आणि प्रशिक्षक शास्त्री एकमेकांशी बोलत होते. या दोघांनना कल्पना नव्हती की ऑनलाइन पत्रकार परिषद सुरू झाली असून माइक सुरू आहेत तसेच सर्वजण आपले बोलणे ऐकत आहेत. या दोघांचे बोलणे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात दोघे काय बोलत होते. वाचा- बुधवारपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यातील पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. भारताला इंग्लंड दौऱ्यात प्रथम न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहे. यासंदर्भातच कोहली आणि शास्त्री यांच्यात चर्चा सुरू होती. इंटरनेटवर या दोघांचा जो संवाद व्हायरल होत आहे त्यात शास्त्री बोल्ट आणि वॅगनर यांचा उल्लेख करतात. त्यावर विराट म्हणतो, हम इनको राउड द विकेट डालेंगे, लेफ्ट हैंडर्स है इनपे, लाला सिराज सबको शुरू से ही लगा देंगे।’ वाचा- वाचा- असा आहे इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ ६ कसोटी सामने खेळणार आहे. यातील पहिली लढत न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदासाठी असेल. ही लढत १८ ते २२ जून याकाळात होईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. त्याची सुरुवात ४ ऑगस्टपासून होईल. तर अखेरची पाचवी कसोटी १० ते १४ सप्टेंबर या काळात खेळवली जाईल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RmYyww
No comments:
Post a Comment