साउदम्प्टन: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप फायनलसाठी फक्त दोन दिवश शिल्लक आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या या अजिंक्यपदाच्या लढतीसाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सज्ज झाले आहे. या लढती आधी न्यूझीलंडच्या संघातील एका अनुभवी फलंदाजाने त्याचे मत व्यक्त केले आहे. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने मंगळवारी दिलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत फायनल सामन्याबद्दलचे मत सांगितले. भारताने क्रिकेटमध्ये नवा उच्च स्थर निर्माण केला आहे. त्याच्या राखीव खेळाडूंची क्षमता देखील चांगली आहे. त्यामुळे १८ तारखेपासून होणाऱ्या फायनल सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागले. वाचा- तुम्ही भारीतय संघाकडे पाहिले तर त्याच्याकडे सर्व खेळाडू हे जागतिक दर्जाचे आहेत. भारत फायनल सामन्यासाठी ज्या खेळाडूंची निवड करेल त्यातून बाहेर बसलेले खेळाडू देखील जागतिक दर्जाचे असतील. आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे की अशा एका संघाचा सामना करायचा आहे जो प्रचंड आव्हानात्मक आहे, असे रॉस टेलर म्हणाला. वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये भारत मोठ्या कालावधीपासून अव्वल स्थानावर होता. आम्ही इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने खेळले आहेत. पण भारताविरुद्ध त्यांच्या देशात, विदेशात किंवा तटस्थ ठिकाणी सामना खेळणे हे मोठे आव्हान असते. भारतीय संघ नेहमीच संतुलित असतो आणि त्यांच्याकडे अनेक पर्याय असतात. वाचा- फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीत भारत मोठ्या काळापासू शानदार संघ राहिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. भारताची ती कामगिरी सर्वांनी पाहिली आहे, असे देखील रॉसने म्हटले. इंग्लंडमध्ये दोन कसोटी सामने खेळण्यास मिळणे ही एक आदर्श स्थिती आहे. आम्ही खरच नशिबवान आहोत की आम्हाला दोन कसोटी सामने खेळण्यास मिळाले. सध्याच्या परिस्थितीत यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. वाचा- मोठाअडथळा भारताविरुद्ध होणाऱ्या फायनल सामन्याआधी न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध दोन कोसटी सामन्यांची मालिका खेळली आहे. यात त्यांनी १-० असा विजय मिळवत आयसीसी क्रमवारीत भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. यामुळे फायनल मॅचच्या आधी न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. दोन कसोटी सामने खेळल्याचे न्यूझीलंड संघाला नक्की फायदा होऊ शकते असे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. या उटल भारतीय संघ कोणत्याही सराव सामन्याशिवाय थेट मैदानात उतरणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SARJry
No comments:
Post a Comment