दुबई: इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेटनी शानदार विजय मिळवला आणि मालिका १-०ने जिंकली. भारताविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या आधी मिळवलेल्या या विजयामुळे न्यूझीलंडचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. वाचा- न्यूझीलंडने मिळवलेल्या या विजयामुळे त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा धक्का दिलाय. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडने भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू होण्याआधी क्रमवारीत न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर होती. दुसऱ्या कसोटीतील विजयामुळे त्यांना तीन गुण मिळाले आणि ते अव्वल स्थानी पोहोचले. वाचा- क्रमवारीत न्यूझीलंडचे आता १२३ रेटिंग गुण झाले आहेत तर भारतीय संघाचे १२१ रेटिंग गुण आहेत. अर्थात एकूण गुणाबाबत न्यूझीलंड भारताच्या मागे आहे. त्याच्या नावावर २१ सामन्यात २ हजार ५९३ गुण आहेत. तर भारताकडे २४ सामन्यात २ हजार ९१४ गुण आहेत. वाचा- क्रमवारीत ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह तिसऱ्या, इंग्लंड १०७ गुणांसह चौथ्या, पाकिस्तान ९४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात जेव्हा आयसीसीने क्रमवारीची वार्षिक अपडेट दिले होते तेव्हा भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला होता. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gjirxV
No comments:
Post a Comment