लंडन: न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायलसाठी फक्त पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. फायनल सामन्याआधी भारतीय संघातील खेळाडू एक सराव सामना खेळत आहेत. या सराव सामन्यात विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत()ने धमाकेदार शतकी खेळी केली. वाचा- WTC फायनलच्या आधी भारतीय संघातील खेळाडूंचे दोन गट करण्यात आले आणि तीन दिवसांचा सराव सामना खेळवण्यात आला. या सराव सामन्यात पंतने ९४ चेंडूत नाबाद १२१ धावा करून फायनल मॅचसाठी तयार असल्याचा इशारा दिला. वाचा- वाचा- पंतने ऑस्ट्रेलियात आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धमाकेदार फलंदाजी केली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी तो सज्ज झाला आहे. पंतसोबत सलामीवीर शुभमन गिल ()ने या सामन्यात १३५ चेंडूत ८५ धावा केल्या. वाचा- गोलंदाजांमध्ये इशांत शर्मा()ने तीन विकेट घेत संघ व्यवस्थापनाचे टेन्शन वाढवले. कारण कर्णधार विराट कोहली इशांतच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करेल अशी चर्चा सुरू आहे. शतक करण्याआधी अर्धशतक झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत आला होता. पण शतकानंतर सर्वांनी त्याचे कौतुक करण्यास सुरूवात केली. अनेक चाहत्यांनी या सामन्याचा व्हिडियो उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बीसीसीआयकडे केली आहे. पाहा चाहते काय म्हणाले...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ROaQy1
No comments:
Post a Comment