दुबई: क्रिकेटमध्ये दुखापत होऊ नये म्हणून फलंदाज आवश्यक खबरदारी घेत असतात. पण अनेक वेळा अशा काही घटना घडतात ज्यामुळे काळजाचा ठोका चुकतो. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळ आहे. एका सामन्यात त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. वाचा- स्पर्धेतील लढती सध्या दुबईत सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात रसेल क्वेटा ग्लेडिएटर्सकडून फलंदाजी करत होता. प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज मोहम्मद मूसाचा एक चेंडू रसेलच्या हेल्मेटला लागला आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वाचा- करोनामुळे स्थगित झालेली ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शुक्रवारी रसेल पहिलीच मॅच खेळत होता. इस्लामाबाद युनायडेटविरुद्ध खेळताना १४व्या षटकात रसेलने सलग दोन चेंडूवर दोन षटकार मारले. त्यानंतर मोहम्मद मूसाने एक बाउंसर चेंडू टाकला. ज्याचा अंदाज घेण्यास रसेलकडून चूक झाली आणि चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. वाचा- चेंडू हेल्मेटला लागल्याने कन्कशनच्या नियमामुळे फिजिओ मैदानात दाखल झाले. त्यानंतर देखील रसेलेने फलंदाजी सुरू ठेवली. पण पुढील चेंडूवर तो बाद देखील झाला. त्याने ६ चेंडूत १३ धावा केल्या. बाद झाल्यानंतर रसेलला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वाचा- या सामन्यात इस्लामाबाद संघाला दिलेले १३३ धावांचे विजयाचे लक्ष्य त्यांनी १० षटकात पार केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zmjh4F
No comments:
Post a Comment