एजबेस्टन: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत पहिल्या डावात ३०३ धावा केल्या. उत्तरा दाखल न्यूझीलंडने ३८८ धावा केल्या. इंग्लंडचा दुसरा डाव मात्र गडगडला, तिसऱ्या दिवशी इंग्लंडने १२० धावात ८ विकेट गमावले होते. वाचा- करोना व्हायरसच्या काळात होणाऱ्या या लढतीत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने धोका पत्करून चाहत्यांना मैदानात प्रवेश दिला. पण या चाहत्यांनी क्रिकेटला बदनाम केले. स्टेडियममध्ये सामना पाहण्यास आलेल्या काही प्रेक्षकांनी मद्यपान करून मोठा गदारोळ केला. यात घटनेत दोन कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. वाचा- द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार स्टेडियममध्ये सामना पाहण्यास आलेल्या अनेक चाहते मद्याच्या नशेत होते आणि त्यांचा गोंधळ सुरू होता. काहींनी बिअर सोबत आणली होती. अशातच काही प्रेक्षकांमध्ये वाद सुरू झाला आणि काहींना दुखापत झाली. वाचा- करोनामुळे स्टेडियमध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात नव्हता. काही महिन्यांपूर्वी थोड्या प्रमाणात चाहत्यांना प्रवेश दिला गेला. पण करोनाची लाट पुन्हा आल्याने बंदी घातली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी २५ टक्के चाहत्यांना प्रवेश मिळाला. तर दुसऱ्या कसोटीसाठी ५० टक्के (१८ हजार) चाहत्यांना प्रवेश देण्यात आला होता. हा प्रवेश देताना १८ वर्ष ही मर्यादा घातली गेली होती. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35dAhvZ
No comments:
Post a Comment