नवी दिल्ली : विश्व अजिंक्यपद स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी कसून सराव केला आहे. पण या सामन्यामध्ये भारतासाठी न्यूझीलंडचा एक गोलंदाज भारतासाठी धोकादायक ठरू शकतो, असे भारताचे माजी कर्णधार आणि समोलाचक सुनील गावस्कर यांनी भविष्यवाणी केली आहे. गावस्कर नेमकं काय म्हणाले, पाहा...इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा एक वेगवान गोलंदाज भारताला धक्के देऊ शकतो, असे गावस्कर यांनी सांगितले आहे. याबाबत गावस्कर म्हणाले की, " इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळत असते. त्यामुळे माझ्यामते न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सर्वात जास्त प्रभावी ठरू शकतो. त्याचबरोबर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांच्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन यांच्यामध्ये मैदानात कडवी झुंज पाहायला मिळू शकते." पुजारासाठी हा गोलंदाज ठरू शकतो धोकादायक...चेतेश्वर पुजारा हा भारताच्या कसोटी संघाचा आधारस्तंभ आहे. पण या सामन्यात पुजारासाठी न्यूझीलंडचा कोणता गोलंदाज धोकादायक ठरू शकतो, याबाबतही गावस्कर यांनी आपेल मत व्यक्त केले आहे. गावस्कर यांनी यावेळी सांगितले की, " पुजारा हा भारताचा एक भरवश्याचा फलंदाज आहे. पण या सामन्यात पुजारा आणि न्यूझीलंडचा गोलंदाज नी वॅगनर यांच्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरावरही सर्वांचे लक्ष असेल. या सामन्यात बुमरा आणि न्यूझीलंडचा डेव्हिड कॉन्वे यांच्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळू शकते." विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी आज न्यूझीलंडने आपला १५ सदस्यांच्या संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा संघ या फायनलपूर्वी इंग्लंडबरोबर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला असून त्यांनी यामध्ये विजयही मिळवला आहे. त्यामुळे फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या संघाचा चांगलाच सराव झाल्याचे पाहायला मइळत आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे पारडे या सामन्यासाठी जड समजले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pS6bYA
No comments:
Post a Comment