नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार हा आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचे सचिव यांनी दिले. राहुल द्रविडच भारतीय संघाचा कोच असेल यासंदर्भातील वृत्त याआधी सूत्रांकडून कळाले होते. पण त्या वृत्ताला आज बीसीसीआयकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला. वाचा- मोठाअडथळा शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ प्रत्येकी तीन सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. या सर्व लढती कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. राहुल द्रविड हेच भारताचे श्रीलंका दौऱ्यातील मुख्य प्रशिक्षक असतील असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. वाचा- या दौऱ्यासाठी भारतीय खेळडू सोमवारी मुंबईत दाखल झाले आहेत. आता ते सात दिवस कठोर क्वारंटाइनमध्ये राहतील. त्यानंतर सात दिवस ते एकत्र सराव करतील. भारतीय संघासोबत काम करण्याची ही द्रविडची दुसरी वेळ असेल. याआधी द्रविडने २०१४ साली इंग्लंड दौऱ्यात संघाचा फलंदाजीचा सल्लागार म्हणून काम पाहिले होते. द्रविड सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. वाचा- भारतीय संघ २८ जून रोजी श्रीलंकेला रवाना होईल. त्यानंतर ३ दिवस क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण करून ते एकत्र सराव सुरू करतील. या दौऱ्याची सुरुवात १३ जून रोजी वनडे मालिकेने होणार आहे. जुलै महिन्यात जेव्हा भारताचा एक संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असेल तेव्हा दुसरा संघ श्रीलंकेत मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील. वाचा- भारताच्या या संघात वनडे आणि टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असले. अर्थात या संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आदी स्टार खेळाडू असणार नाहीत. भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये असल्याने या संघात जसे स्टार खेळाडू असणार नाहीत तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड देखील असणार नाही. कारण हे सर्व जण इंग्लंडमध्ये कसोटी संघासोबत असतील. त्यामुळेच राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. दौऱ्याचे वेळापत्रक पहिली वनडे १३ जुलै, दुसरी १६ तर तिसरी आणि अखेरची १९ जुलै रोजी होणार आहे. २२ जुलै पासून टी-२० मालिका होणार असून २४ ला दुसरी तर २७ जुलै रोजी तिसरी आणि अखेरची टी-२० लढत होईल. अर्थात या संदर्भात बीसीसीआयने अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ ५ जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होणार आणि मालिका संपल्यानंतर २८ जुलै रोजी भारतात परत येईल. वाचा- श्रीलंका दौऱ्यातील भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3iEhmm5
No comments:
Post a Comment