साउदम्प्टन : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीने कंबर कसली आहे. फायनल मॅचसाठी जोरदार सराव करत आहे. भारतीय संघाने फायनल आधी एक सराव सामना देखील खेळला. वाचा- बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या सरावाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये विराट कोहली आक्रमक स्टाइलने फलंदाजी करताना दिसतोय. सराव सत्रात विराट बाउंसर चेंडूवर पुल शॉट मारताना दिसला. विराटची ही फलंदाजी पाहून भारतीय चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. फायनल सामन्यात विराटकडून अशीच मोठी खेळी अपेक्षित असेल. वाचा- वाचा- WTC फायनलची लढत १८ जून रोजी साउदम्प्टन येथे सुरू होईल. पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपसाठी विराट कोहली आणि केन विलियमसन यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघ भिडतील. या सामन्याआधी दोन्ही संघांच्या कामगिरीवर चर्चा सुरू आहे. कर्णधार म्हणून विराटने कसोटीत २० शतक केली आहेत तर विलियमसनने ११ शतक केली आहेत. वाचा- विराटने आतापर्यंत ९१ कसोटीत ५२.३७च्या सरासरीने ७ हजार ४९० धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने २७ शतक आणि २५ अर्धशतक केली आहेत. या उटल केनने ८४ कसोटीत ५३.६०च्या सरासरीने ७ हजार १२९ धावा केल्या असून त्यात २४ शतक आणि ३२ अर्धशतक आहेत. वाचा- फायनल मॅचच्या आधी न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करून आयसीसी क्रमवारीत भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cExlMX
No comments:
Post a Comment